वसंत डावखरे बिनविरोध

May 14, 2010 10:30 AM0 commentsViews: 77

14 मे

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीकरता डावखरेंच्या विरोधात शिवसेनेने दोन उमेदवार दिले होते. आज दुपारी त्या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

यात कल्याण-डोंबिवलीचे महापौर रमेश जाधव यांचा समावेश आहे. डावखरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा माघारीचा निर्णय झाला.

डावखरे ठाण्यातून चौथ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा डावखरे यांना त्यांच्या सर्वपक्षीय सलोख्याने हात दिला आहे.

close