99 वर्षांच्या आजींवर शस्त्रक्रिया, आजी एकदम फिट

December 14, 2016 1:58 PM0 commentsViews:

14 डिसेंबर,हलिमा कुरेशी – जिंदादिल असणं हे वयावर अजिबातच अवलंबून नसतं हे दाखवून दिलंय पुण्यातल्या 99 वर्षांच्या आजींनी, शालिनी चिरपुटकर यांनी.2 वर्षांपूर्वी त्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. नुकतंच पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्येआजींची हिप रिप्लेसमेंट केली गेली.

‘मी मनानं तरुण आहे. जगायचं तर तोंड वाकडं करून कशाला?’ आजींचा हा दिलखुलास अंदाज.

99 वर्षांच्या तरुण आजी हॉस्पिटलच्या बेडवर असूनही इतक्या सोप्या शब्दात, हसतहसत त्यांनी जीवनाचं सार सांगितलं. नुकतीच त्यांची हिप रिप्लेसमेंट झाली. त्यांची तब्येत उत्तम असल्यानंच 99व्या वर्षी ही शस्त्रक्रिया करुन घेण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचं आजींची मुलगी सांगते.

दरम्यान वय किती आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर पेशंटची तब्येत चांगली असल्यानं हीप रिप्लेसमेंटचा निर्णय घेतल्याचं डॉक्टरही सांगतात.

अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींचा बाऊ करुन आपण जगणंच विसरतो. पण या आजी 97व्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, अजूनही शिवणकाम करतात, वाचन करतात आणि जगायचं तर आनंदी जगा असं सांगतात. त्यांची ही उमेद आणि उत्साह नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close