रिलायन्सला संध्याकाळपर्यंत मुदत

May 14, 2010 10:37 AM0 commentsViews: 9

14 मे

टाटा आणि रिलायन्स यांच्यातील वीजविक्रीचा वाद थांबण्यास तयार नाही. टाटा पॉवरकडील वीज नियंत्रित दरातच मिळाली पाहिजे, यावर अनिल अंबानीची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ठाम आहे.

तर ही वीज बाजारभावाने देणार, असे टाटा पॉवर कंपनीचे म्हणणे आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या उपसमितीने 6 मे रोजी टाटा कंपनीला पत्र पाठवले होते. रिलायन्सला नियंत्रित दरात वीज द्यावी, असे या समितीने सुचवले आहे.

पण अशा पद्धतीने वीज देणे शक्य नसल्याचे टाटा कंपनीने काल राज्य सरकारला कळवले. तसेच रिलायन्सलाही त्यांनी पत्र पाठवले आहे. आणि त्यावर उत्तर देण्यासाठी रिलायन्सला आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे रिलायन्स कंपनी आज काय काय भूमिका घेते, यावर मुंबईकरांच्या लोडशेडिंगच्या संकटाचे भविष्य ठरणार आहे. रिलायन्स आणि टाटाच्या या वादात राज्य सरकार आणि वीज नियामक आयोगाचीही मध्यस्थी सुरू आहे.

close