कपिल शर्माविरुद्ध एफआयआर दाखल

December 14, 2016 5:46 PM0 commentsViews:

kapil_gm_150916

 

14 डिसेंबर - कॉमेडी किंग कपिल शर्माच्या विरोधात पर्यावरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झालाय.
कपिलच्या वर्सोवामधल्या ऑफिससाठी मॅनग्रोव्हज म्हणजे खारफुटी नष्ट करण्यात आली, असा त्याच्यावर आरोप आहे. एनव्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत त्याच्यावर हा एफआयआर दाखल झालाय. कपिलवरचे हे आरोप सिद्ध झाले तर 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

कपिल शर्माने निवासी जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे एमआरटीपी ॲक्टनुसारही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झालीय. यामध्ये 3 वर्षं शिक्षेची तरतूद आहे.

याआधी कपिल शर्माने, महापालिका अधिकारी आपल्याकडे लाच मागतायत, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. याबद्दल त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटही केलं होतं. महापालिका अधिकाऱ्याने आपल्याकडे 5 लाख रुपये मागितले, असं
कपिलचं म्हणणं होतं. पण आता बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कपिल शर्मावरच एफआयआर दाखल झालाय.

कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यावर भरपूर राजकारण झालं. शिवसेनेने कपिल शर्माच्या विरोधात निदर्शनं केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close