महेश शहाचं महाराष्ट्र कनेक्शन, 13 हजार कोटींत 5 जणांची संपत्ती ?

December 14, 2016 7:51 PM0 commentsViews:

maesh_shah14 डिसेंबर : 13 हजार कोटींची माया जमवणा-या महेश शहाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय. महेश शहाने जाहीर केलेले पैसे हे त्याचे नाहीत. त्याच्याकडे असलेले पैसे हे मुंबई, पुणे, नाशिकमधून मिळल्याची शक्यता आहे. तसंच विदर्भातूनही महेश शहाकडे पैसे गेल्याचा संशय आहे. महेश शहाच्या डायरीतूनच ही माहिती मिळाली आहे.

अहमदाबादमधील महेश शहा नावाच्या व्यापा-याने इन्कम टॅक्स डिक्लेरेशन योजनेअंतर्गत आपल्याकडे 13,860 कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं. संपत्ती जाहीर केल्यानंतर पहिली फेड चुकवण्याआधीच महेश शाह फरार झाला होता. महेश शाहला पहिली फेड ही 1560 कोटी भरायची होती.

दरम्यान, महेश शाह न्यूज 18 इंडियाच्या कार्यक्रमात समोर आला. त्यावेळी त्याने आपल्याकडे असलेली संपत्ती ही माझी नाही असा दावा केला होता. वेळ आल्यावर ही संपत्ती कुणाची आहे हे जाहीर अशी ग्वाहीही दिली. पण त्याला . नेटवर्क 18 च्या कार्यालयात लाईव्ह कार्यक्रमात आयकर विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिका•यांनी स्टुडिओ मध्येच महेश शाहला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय. महेश शहाने 5 जणांची बेनामी संपत्ती दाखवली आहे. ही संपत्ती त्याला महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नाशिकमधून मिळल्याची शक्यता आहे. तसंच विदर्भातूनही महेश शहाकडे पैसे गेल्याचा संशय आहे. त्यामुळे महेश शहाच्या डायरीत कोणाची नावं आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोण आहे महेश शहा?

- महेश शहा गुजरात व्यापारी
- महेश शहानं 13 हजार 860 कोटींची घोषणा केली होती
- हा पैसा 4 ते 5 जणांचा असल्याचं डायरीतून समोर
- अहमदाबाद, बडोदा, मुंबई, नाशिक आणि नागपूरमधून पैसे मिळाले
- संपत्ती घोषित केल्यानंतर शहा फरार झाला होता
- दोन आठवड्यांपूर्वी तो नेटवर्क 18 च्या अहमदाबाद स्टुडिओमध्ये शरण आला होता


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close