चोरीच्या संशयावरुन पोटच्या मुलीला अमानुष मारहाण

December 14, 2016 8:40 PM0 commentsViews:

kalyan414 डिसेंबर : पोटची मुलगी चोरी करते असा समज करून अनुपमा चुन्नीलाल नावाच्या महिलेने साक्षी नावाच्या आपल्या 8 वर्षांच्या मुलीला कपड्याने बांधून ठेवले आणि गळ्याला फास लावून तिला मारहाण केल्याची घटना घडलीये. हा प्रकार शेजारी राहणा-यानी आपल्या कॅमे-यात कैद केला आणि त्या मुलीची सुटका केलीये.

अनुपमा गेल्या महिनाभरापासून या मुलीला मारहाण करत होती. अनेकदा तिच्या आईला शेजारच्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने याकडे दुर्लक्ष करीत मुलीला दररोज मारहाण करणे सुरूच ठेवले. अखेर शेजारी राहणा-यानी या मुलीची सुटका केली. परंतु, मुलीचे प्राण वाचवायला गेलेल्या शेजारी जन्नत बी आणि त्यांच्या कुटुंबाला शेजारच्या रुक्मिणी पवार आणि त्यांच्या कुटुंबाने मुलीला मदत करताना अडवलं. ती लहान मुलगी आणखी चोरी करू शकते असा आरोप करीत असतानाच शेजारच्यांमध्येच एकमेकांविरोधात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close