जे राज्यात झालं तेच पुण्यात होईल -गिरीश बापट

December 14, 2016 8:49 PM0 commentsViews:

girish bapat314 डिसेंबर : नगरपालिका निवडणुकीत जे राज्यात झालं तेच पुणे जिल्ह्यातही होईल असा दावा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलाय. पुण्यातल्या ज्या नगरपालिकांमध्ये भाजपची ताकद कमी होती तिथं ती लक्षणीय वाढलीये. उद्याच्या निकालात ते दिसूनच येईल असा दावा गिरीश बापट यांनी केलाय.

दहा नगरपालिका पैकी भाजपचे सात नगरसेवक बिनविरोध आले आहेत. पुणे जिल्ह्यात भाजप ताकदीने उतरलंय.जागोजागी जाऊन मी सभा घेऊन राज्य सरकारच काम पोहोचवलं. कार्यकर्ता हीच आमची ताकद आहे त्यांच्या जीवावर निवडणूक लढवत आहे. राज्यात जे घडलं तेच पुणे जिल्ह्यात घडेल असा आत्मविश्वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय. पुण्यात शनिवारवाडा येथे 150 फूट उंच आणि 36 फूट बाय 24 फूट आकाराच्या तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी बापट माध्यमांशी बोलत होते. नगरसेवक हेमंत रासने यांच्या पुढाकाराने 66 लाख रुपये खर्च करून तिरंगा ध्वज उभारण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close