भुजबळांची रवानगी जेलमध्ये करा, विशेष ईडी कोर्टाचे आदेश

December 14, 2016 10:01 PM0 commentsViews:

Chagan Bhujbal new114 डिसेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन फेटाळल्यानंतर आणखी एक धक्का बसलाय. आता ईडीच्या विशेष कोर्टाने भुजबळांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्याचे आदेश दिले आहे.

छगन भुजबळांसाठी आजचा दिवस वाईट होता. एकीकडे मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळला तर दुसरीकडं ईडीच्या विशेष कोर्टाने छगन भुजबळांची रवानगी हॉस्पिटलमधून जेलमध्ये करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशानं भुजबळांचा हॉस्पिटलमधील मुक्काम संपुष्टात आलाय. भुजबळांवर अँजिओग्राफी करण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांचा सल्ला घ्या. त्याबाबत निर्णय झाल्यानंतरच भुजबळांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये न्या अशा सूचनाही कोर्टाने दिल्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा