कोल्हापुरात सरकारी कर्मचार्‍यांचंच अतिक्रमण

October 19, 2008 8:46 AM0 commentsViews: 7

19 ऑक्टोबर, कोल्हापूरकोल्हापूर महापालिकेची आरक्षित जागा पालिकेचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनीच बळकावल्याचं उघडकीस आलं आहे. कोट्यवधी रूपयांच्या किंमतीची ही जागा आहे. मैल खड्डा परिसरातील जागेवर कोल्हापूर महापालिकेनं कॉलेजसाठी आरक्षण केलं होतं. पण याठिकाणी विनापरवाना 200 हून अधिक घरं बाधण्यात आली आहे. महितीच्या अधिकाराचा वापर करून प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी ही माहिती उजेडात आणलीय. बाजारभावानुसार या जागेची किमंत 4 कोटी 84 लाख रुपये इतकी होते. याप्रकरणी पालिका अधिकार्‍यांचं उत्तर सरकारी रिवाजाप्रमाणेच आहे. ' कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व्हे नंबर 714 अ याविषयी अतिक्रमणाची तक्रार दाखल झाली आहे.त्याबाबत रितसर चौकशी करुन नियमाप्रमाणं करवाई करण्यात येईल', असं करवीरच्या नायब तहसिलदारानं उत्तर दिलंआहे. महापालिकेच्या आरक्षित जागेवर इतकं बांधकाम होताना प्रशासनाचं तिकडं लक्ष कसं गेलं नाही, हे आश्चर्य आहे. माहितीच्या अधिकारामुळं उघडकीस आलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असताना कर्मचार्‍यांनी केलेल्या भूखंडाचा दुसरा घोटाळा उघडकीस आला आहे.

close