पुणे, लातूर जिल्ह्यातल्या 14 नगरपालिकांचा आज निकाल

December 15, 2016 9:09 AM0 commentsViews:

15 डिसेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही भाजपला जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाचा फायदा झाला. पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपालिकांपैकी5 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदांच्याबाबतीत भाजप पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीचं नगराध्यपद पटकावलं आहे. तर, काँग्रेसनं लातूरची सत्ता गमावली आहे. 14 पैकी  भाजप 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 2 इतर 3 तर एका ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला आहे.

 • अहमदपूर (जागा 23)

राष्ट्रवादी काँग्रेस – 9
भाजप – 6
शिवसेना – २
काँग्रेस – २
बहुजन विकास आघाडी – ४

नगराध्यक्ष – अश्विनी कासनाले (बविआ)

 • औसा (जागा २०)

राष्ट्रवादी काँग्रेस – १२
काँग्रेस – २
भाजप – ६

नगराध्यक्ष – अफसर शेख (राष्ट्रवादी)

 • निलंगा ( जागा २०)

भाजप – १४
काँग्रेस – ६

नगराध्यक्ष – श्रीकांत शिंगाडे (भाजप)

 • उदगीर (जागा ३८)

शिवसेना – ७
काँग्रेस – ७
एमआयएम – ६
भाजप – ५
——————————————————–

 • जुन्नर ( जागा १६)

राष्ट्रवादी : ७
शिवसेना : ६
काँग्र्रेस  : २
आपला माणुस : २

शिवसेनेचे शाम पांडे नगराध्यक्षपदासाठी विजयी

 • आळंदी : (एकुण जागा : १८)

भाजप : १०
शिवसेना : ८

नगराध्यक्षपदी भाजपच्या वैजयंता उमरगेकर

 • शिरूर :   (एकुण जागा : २२)

शहर विकास आघाडी : १७
भाजप : २
अपक्ष : २
लोकक्रांती आघाडी : १

शहर विकास आघाडीच्या वैशाली वाखरे ५ हजार मतांनी नगराध्यक्ष पदासाठी विजयी.

 • तळेगाव दाभाडे (एकूण जागा २५)

भाजप : २०
राष्ट्रवादी :६

 नगराध्यक्षपदी भाजप च्या चित्रा जगधने १४ हजार मतांनी विजयी

 • लोणावळा नगरपरिषद

एकूण जागा :२५
भाजपा आरपीआय युती – ८+१
काँग्रेस – ६
शिवसेना – ६
अपक्ष – ४

नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा जगताप विजयी

 • दौंड (एकूण जागा २४)

राष्ट्रवादी काँग्रेस – 12
शिवसेना – 3
नागरिक हित आघाडी – ८

नगराध्यक्ष – शीतल कटारिया (नागरिक हित आघाडी)

 • सासवड ( एकूण जागा १९)

जनमत आघाडी – 15
शिवसेना – 4

 • इंदापूर

काँग्रेस – 8
राष्ट्रवादी – 9

नगराध्यक्ष – अंकिता शहा (काँग्रेस)

 • बारामती ( जागा ३९)

बारामती – ३५
भाजप आघाडी – ४

नगराध्यक्ष – पौर्णिमा तावडे (राष्ट्रवादी)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close