सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील दारूच्या दुकानांवर बंदी – सुप्रीम कोर्ट

December 15, 2016 1:44 PM1 commentViews:

liquor-med

15 डिसेंबर : हायवेवर दारू विक्री करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. सर्वच राज्यातील महामार्गांवरील दारूच्या दुकानांना परवाने देणं बंद करा, असा महत्वपुर्ण आदेश  कोर्टाने केंद्र आणि राज्यसरकारांना दिला आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून हायवेवर दारू विक्री पुर्णपणे बंद होणार आहे.

यापुढे माहामार्गांवर दारुच्या दुकानांसाठी नवे परवाने मिळणार नाहीत. तसंच परवाने रिन्यू करुनही मिळणार नाही. त्यामुळे परवाना असेपर्यंत दुकानं सुरु राहतील.

एप्रिल महिन्यात हायवेवरील सर्व दुकानदारांचे परवान्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून खऱ्या अर्थाने हायवेंवर दारू विक्री पुर्णपणे बंद होणार आहे.

यापुर्वी कोर्टाने हायवेवरील दारू विक्रीवर नाराजी व्यक्त केली होती. हायवेवरील दारूची दुकाने हटवण्याचा निर्णय केंद्र आणि राज्यसरकारांनी घेतला होता. त्यावर आक्षेप घेणारी जनहित याचिका काही दारू विक्रेत्यांनी कोर्टात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने कडक ताशेरेही ओढले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Praveen Wadhonkar

    What about the liquor shops and bars which are on highways but within city limits? are they comes under court’s decision?

close