आता ‘डोंबिवली’ जवळच ‘नवी डोंबिवली’चं स्टेशन

December 15, 2016 3:34 PM0 commentsViews:

Navi Dombicli12

15 डिसेंबर :  डोंबिवलीकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणा-या वसई-दिवा-पनवेल या मार्गाला 21 डिसेंबर रोजी दिल्लीत होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे. या मार्गावर नवी डोंबिवली हे नवं रेल्वे स्थानक निर्माण होणार आहे.

विरार-वसई-पनवेल यादरम्यान उपनगरीय वाहतुकीसाठी दुहेरी रेल्वेमार्ग बांधण्याचा प्रस्ताव असून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसंच याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 डिसेंबर रोजी त्यांच्या मुंबई दौऱ्यात करतील असंही आता बोललं जात आहे. उपनगरीय रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी या नव्या रेल्वे मार्गाची आखणी रेल्वेतर्फे करण्यात आलीय.

विरार-वसई-पनवेल या 70 किमीच्या दुहेरी रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या 70 किमीच्या प्रकल्पात 23 नवी स्थानकं असतील. या संपुर्ण प्रकल्पासाठी 9 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याच मार्गावर मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानका जवळच ‘नवी डोंबिवली’ नावाचं नवं स्थानक होणारे. त्यामुळे मुंबईत नवी डोंबिवली नावाचं नवं स्टेशन तयार होत असल्याने या गोष्टीचा डोंबिवलीकरांना निश्चितच अभिमान वाटेल एवढं नक्की.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close