पुण्यात राष्ट्रवादीला धक्का, भाजपची मुसंडी

December 15, 2016 3:53 PM0 commentsViews:

bjp-flag-rally

15 डिसेंबर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला दोन जागांवरच सरशी साधता आली असून, भाजपाने 3 नगरपालिकांमध्ये यश मिळवित मुसंडी मारल्याचे दिसत आहे.

यात पुण्यातील 10 पैकी 3 जागांवर भाजपाने यश मिळविले आहे.

आळंदी, लोणावळा आणि तळेगावमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. तळेगावात भाजपा आघाडीने तब्बल 16 जागा पटकावल्या. तर जुन्नरमध्ये सेनेचा भगवा फडकला आहे. इंदापूर व सासवडची सत्ता काँग्रेसने कायम राखली आहे.

इंदापूरच्या नगराध्यक्षपदी काँगेसच्या अंकिता शहा निवडून आल्या आहेत. मात्र, जेजुरीची सत्ता काँग्रेसला गमवावी लागली असून, तेथे राष्ट्रवादीची सरशी झाली आहे.

बारामतीत राष्ट्रवादीने आपला गड कायम राखलाय असला, तरी तिथे भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. बारामतीत राष्ट्रवादीला 39 पैकी 36 जागा जिंकता आल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close