लातूरकरांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला,’कमळ’ उमललं

December 15, 2016 7:23 PM0 commentsViews:

bjp_flagसिद्धार्थ गोदाम , नितीन बनसोडे, लातूर,15 डिसेंबर - मराठवाड्यातल्या लातूरमध्ये आज झालेल्या निवडणूक निकालात काँग्रेस भुईसपाट झालीय तर भाजपला दोन जागी लॉटरी लागली.राष्ट्रवादी काँग्रेसला औसाच्या माध्यमातून एक जागा मिळवता आलीय.एमआयएमचा औसामध्ये सफाया झाला तर काही जागांच्या जोरावर एमआयएमने उदगीरमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे.

लातूर जिल्हा तसा काँग्रेस आणि विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातल्या चार पैकी तीन नगर परिषदेवर काँग्रेसचा कब्जा होता.उदगीर तर स्थापनेपासूनच काँग्रेसच्या ताब्यात होतं.आणि एकाच नगराध्यक्षाचा कंटाळा आल्याने यंदा लोकांनी उदगीर भाजपच्या हाती दिलीय. आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानी फेकली गेलीय.उदगीरमध्ये खरी लढत झाली ती एमआयएम आणि भाजपमध्ये.एमआयएमच्या उमेदवारीमुळे उदगीरला सर्वाधिक फटका बसला तो काँग्रेसला.

आता औसा सुद्धा काँग्रेस आणि बसवराज पाटील यांच्या हातातून गेलंय. आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी यश मिळालं.औसामध्ये सुद्धा एमआयएममुळे मुस्लिम मतदान विभागले. मात्र या विभागणीचा फायदा भाजपला घेता आला नाही.त्यामुळे मुस्लिम असलेल्या अफसर शेख यांना मुस्लिम आणि राष्ट्रवादीमुळे मराठा मतदान मिळवता आलं. औसामध्ये नगराध्यक्षच नाही. तर 20 पैकी 12 नगरसेवक लोकांनी निवडून दिलं.

निलंगा पालिकेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांचं वर्चस्व कायम राहिलं. मात्र, यावेळी त्यांचा नातू आणि भाजपचे विद्यमान मंत्री संभाजी पाटील यांनी अस्तित्वाची लढाई समजून प्रयत्न केल्याने पालिका हिसकावून घेण्यात यश आलं.

अहमदपूर पालिकेत दीर्घ काळ कोणत्याही पक्षाची सत्ता राहिली नाही. मात्र, या मतदारसंघाचे आमदार विनायक पाटील यांनी बहुजन विकास आघाडी हे पॅनल उभं केलं आणि लोकांनी याला पसंती दिली.या आधी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पालिका आता विनायक पाटील यांनी खेचून आणलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close