जिल्हा बँकांवरची नोटबंदी उठवण्याचे केंद्राचे संकेत

December 15, 2016 9:35 PM0 commentsViews:

bank_open15 डिसेंबर : नोटबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेना मोठा दिलासा मिळण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकांवरची नोटबंदी उठण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्हा बँकांमध्ये पैसे भरता आणि काढता येऊ शकतील.

नोटबंदीनंतर जिल्हा बँकामध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आलीये. या प्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सर्वपक्षीयांनी विनवण्या करुनही नोटबंदी कायम राहिली. आता सुप्रीम कोर्टात याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळेस ही बंदी उठवण्याबाबत रिझर्व बँकेचा विचार सुरू असल्याचं ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी म्हटलंय. जिल्हा बँकांकडे 5 हजार कोटींच्या जुन्या नोटा आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत रिझर्व्ह बँक मनाई मागे घेऊ शकते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close