नागपूर जिल्हा कोर्टात तलवारीने हल्ला

May 14, 2010 12:32 PM0 commentsViews: 6

14 मे

नागपूरच्या जिल्हा कोर्टाच्या परिसरात शिराज नावाच्या व्यक्तीवर काही अज्ञात लोकांनी तलवारीने हल्ला केला. यात शिराज जखमी झाला आहे.

खुनाचा आरोपी असलेल्या शिराज आज दुपारी कोर्टासमोर हजर होण्यास आला होता. त्यावेळी लपून बसलेल्या काही लोकांनी शिराजवर हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळून गेले.

जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही वर्षांआधी याच परिसरात अक्कू यादव नावाच्या गुंडाचा खून करण्यात आला होता.

त्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. जखमी शिराजवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

close