धाडसत्र सुरुच; आतापर्यंत कोट्यवधींची रोकड जप्त

December 16, 2016 9:51 AM0 commentsViews:

money3

16 डिसेंबर :  नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात सुरू असलेलं धाडसत्र अद्यापही सुरूच आहे. दररोज पडणाऱ्या धाडींमधून काळा पैसा पांढरा करण्यासाठी नेणाऱ्यांची बिंग फुटायला लागली आहेत.

चेंबूरच्या छेडा नगरमध्ये काल रात्री उशीरा एका गाडीत टिळक नगर पोलिसांनी 10 कोटी 10 लाख रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या रकमेमध्ये 10 कोटी रुपयांच्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा असून,  10 लाख रुपयांच्या दोन हजारच्या नोटा आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गाडीसह तिघांना ताब्यात घेतलं आहे.

तर वाशिममधील कारंज्यामधून 41 लाख रूपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद-नागपूर महामार्गावरून ही रक्कम घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई करून ही रक्कम हस्तगत केली. या प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नालासोपाऱ्यात शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्या गाडीतून 1 कोटी 11 लाख रूपयांची रक्कम पकडण्यात आली. त्यानंतर या सेना नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

कल्याणमधील खडकपाडा भागातून नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या 2 जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून 2 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्यात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close