राहुल गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

December 16, 2016 1:03 PM0 commentsViews:

CzxrlbYUUAA9PNp

16 डिसेंबर :  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी (शुक्रवारी) काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळासह भेटीसाठी गेलेले राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना निवेदन दिलं.

शेतकऱ्यांना पिकांना योग्य दर देणे तसेच नोटाबंदीनंतर जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या कजमाफीसाठी वापरण्यात यावी अशी मागणी केली. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले पण कर्जमाफीवर काहीच भाष्य केले नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

 आज (शुक्रवार) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. नोटाबंदीप्रकरणी संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदकोंडी आणि त्यानंतर पंतप्रधानांवर राहुल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र या भेटीत नोटबंदीच्या निर्णयानंतर शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांच्याच चर्चा झाली. यावेळी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन मोदी यांनी राहुल यांना दिलं.

राहुल गांधी म्हणाले, एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे सरकार गव्हावरील आयातशूल्क माफ करते. हे अत्यंत भयानक आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचं मान्य केलं. पण कर्जमाफीवर त्यांनी काहीच म्हटलं नाही. त्यांनी फक्त ऐकून घेतलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close