मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह अधिकाऱ्यांनी जमिनी लाटल्या – सरनाईक

December 16, 2016 1:43 PM0 commentsViews:

Pratap Sarnaik123

16 डिसेंबर : मुंबई नागपूर हायवेवर राज्यातील बड्या अधिकाऱ्यांनी ठाणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांच्या जमीन खरेदीच्या सातबाराच सरनाईकांनी काल सभागृहात दाखवलं. तर आज शिवसेनेनं याच मुद्यावर सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.

दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे त्यात मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी जवळपास एक हजार एकर जमीन स्वत:चे भाऊ, मेहुणे, बहिणी यांच्या नावावर खरेदी केल्याचं उघड झालं आहे. केंद्रानं राज्याच्या सहकार्यानं मुंबई-नागपूर हायवे बांधायला सुरुवात केली आहे. तर हायवेची ही समृद्धी बघून अधिकाऱ्यांनी अगोदरच त्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.

कोणत्या अधिकार्‍यांवर जमीन खरेदीचा आरोप?

मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविणसिंह परदेशींची मेहुण्याच्या नावावर जमीन खरेदी

माजी मुख्य सचिव अरूण बोंगिरवारांची मुलगा पियुषच्या नावावर जमीन खरेदी

माजी मुख्य सचिव जे.पी.डांगेंची मुलगा रवींद्रच्या नावे जमीन खरेदी

सुभाष हजारे यांची भाऊ पुंडलिक आणि भावजयिच्या नावे जमीन खरेदी

ठाणे अतिरिक्त आयुक्त मिलिंद चव्हाण यांची भाऊ सुनील चव्हाणांच्या नावे खरेदी

तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधवांची दोन भावांच्या नावे खरेदी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close