मला खासदारकीचा राजीनामा द्यावासा वाटतोय – अडवाणी

December 16, 2016 8:59 AM0 commentsViews:

advani

16 डिसेंबर :  नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ होत असल्याने कामकाज होत नाही. यामुळे मी खूप निराश झालो असून, राजीनामा देण्याचा विचार माझ्या मनात येत असल्याचं भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज होऊ शकलेले नाही. विरोधी पक्षांच्या खासदारांकडून मोदींनी सभागृहात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर, मोदींनी मला संसदेत बोलू दिले जात नाही, असं म्हटलं आहे. अधिवेशनाच्या कालावधीतील एक दिवस शिल्लक असल्याने या अधिवेशनात कामकाज होणं अशक्य असल्याचं दिसत आहे.

अडवानी म्हणाले, की गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी माझं बोलणं झाले असून, त्यांनी लोकसभा अध्यक्षांना बोलावं आणि नोटाबंदीवर संसदेत चर्चा व्हावी. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज संसदेत असते तर त्यांना दुःख झालं असतं. या गोंधळात संसदेचा पराभव होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close