नोटबंदी रद्द नाहीच, पण आश्वासनं पूर्ण करा -सुप्रीम कोर्ट

December 16, 2016 6:27 PM0 commentsViews:

court_on_note_ban16 डिसेंबर : नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करणा-या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावल्या. कोर्टाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळालाय. तसंच सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करा असं निर्देशही कोर्टाने सरकारला दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. अचानक झालेल्या या निर्णयामुळे देशभरात बँका आणि एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. या प्रकरणी याआधी हायकोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टातले वकील प्रशांत भुषण आणि काही सामाजिक संस्थांनी केंद्राच्या या निर्णयाविरूद्ध जनहीत याचिका दाखल केल्या होत्या.

सुप्रीम कोर्ट असा निर्णय देवू शकत नाही.मात्र सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असं कोर्टाने म्हटलंय. ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी अशा याचिका दाखल करण्यामागे केवळ प्रसिद्धी मिळवणं असा हेतू असल्याचा आरोप केला. तर कोर्टानेही प्रशांत भूषण यांना फटकारलं. अशा महत्वांच्या विषयावर कुठलीही गंभीर तयारी नव्हती असं कोर्टाने म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close