ऑडी,बीएमडब्ल्यूही या घोड्यांपुढे फिक्या, किंमत आहे तब्बल दीड कोटी !

December 16, 2016 6:57 PM0 commentsViews:

निलेश पवार, नंदुरबार, 16 डिसेंबर : या घोड्यांची किंमत आहे…25 हजार ते चक्क दीड दोन कोटींपर्यंत ..म्हणजेचं ऑडी , बीएमड्ब्ल्यु, जॅग्वार यांसारख्या गाड्यांपेक्षांही महाग… हा घोड्यांचा बाजार भरलाय नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडमध्ये ..

savarkhedaघोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी देशाविदेशात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याची यात्रा सुरू झालीये. हा घोडाबाजार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी महामंडळानेही चंग बांधला आहे. यंदा चेतक फेस्टिव्ह लच्या माध्यमातून हा घोडबाजार ग्लोबल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अगदी पंजाब, मारवड अशा विविध प्रजातीचे दोन हजारांहुन अधिक घोड या घोडेबाजारात दाखल झाले आहेत. या घोड्यांचं खाण पिणं , खुराक एखाद्या श्रीमंत माणसाला लाजवेल इतका लाजबाब आणि महागडा असल्यानेच घोड्यांच्या किंमतीही आकाशाला भिडल्या आहेत.

यंदा सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला आतंराष्टीय स्तरावर पोहचवण्यासाठी आयोजकांनी कंबर कसली असुन त्यांना यंदा पर्यटन विभागानेही आर्थिक मदतीद्वारे पाठबळ दिली आहे. सोबतच या फेस्टिव्हलमध्ये भरणारी घोड्याची पळण्याची शर्यत, सौंदर्य स्पर्धा असो की नृत्य स्पर्धा ह्या तर घोडे प्रेमींच्या आकर्षणाचा खास मानबिंदु ठरत आहे.

सारंगखेड्याच्या घोडे बाजारात फेर फटाक मारल्यास विविध कर्तबी दाखवाणारे आणि त्यांच्यावर स्वार असलेले घोडे चालक सध्या सगळ्यांचाच आकर्षणाचा केंद्रबिदू ठरत आहे. त्यातही एक दोन दिवस नव्हे तर पंधरा दिवस चालणारा हा घोडे बाजार दरवर्षी विक्री बाबत आपलेच उचांक मोडतांना दिसुन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close