पार्टीच्या बहाण्यानं घरी बोलावून डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार

December 16, 2016 7:14 PM0 commentsViews:

rape_case_mumbaiनाशिक, 16 डिसेंबर : पार्टीच्या बहाण्यानं घरी बोलावून डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. या प्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहे.

देवळाली परिसरात उच्चभ्रु वस्तीत मित्रानं त्या तरुणीला पार्टीसाठी घरी बोलावलं होतं. पार्टी झाल्यानंतर तीन जणांनी तीच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीनं केलीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीबरोबर यावेळी तीची मैत्रीणदेखील होती. ती मैत्रीण या अत्याचाराचं शूटिंग करत होती अशी धक्कादायक माहिती समोर आलीये.

पोलिसांनी याप्रकरणात एका आरोपीला जेरबंद केलंय. तर इतर आरोपी फरार आहे. काही दिवसांपूर्वी एका शालेय विद्यार्थीनीवर असा अत्याचार झाला होता . त्यानंतर या अत्याचाराचा व्हिडिओ एका व्हॉटसऍप ग्रुपवर फिरत असल्याची माहिती मिळतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close