पुण्यातील अधिकार्‍याचे अपहरण

May 14, 2010 2:51 PM0 commentsViews: 2

13 मे

पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागाचे सहसंचालक व्ही. एस. बर्डेकर यांचे अरुणाचल प्रदेशातून दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे.

पश्चिम केमांग जिल्ह्यातून काल रात्री संशयीत बोडो अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले. ते अरुणाचल प्रदेशमध्ये खाजगी दौर्‍यावर गेले होते.

इटानगरपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या दायमारा गावात ते फिरायला गेले असतोना त्यांचे अपहरण झाले.

बर्डेकरांना फुलपाखरांची आवड आहे. ते अरुणाचल प्रदेशात फुलपाखरांची फोटोग्राफी करायला गेले होते.

11 सशस्त्र तरुणांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती मिळत आहे. बेर्डेकर यांच्यासोबत असलेल्या वन कर्मचार्‍यांनाही या तरुणांनी मारहाण केली.

पोलिसांनी युध्दपातळीवर बेर्डेकर यांचा शोध सुरू केला आहे.

close