55 वर्षांतून एकदाच साजरा होतोय आदिवासींचा मखरोत्सव !

December 16, 2016 8:46 PM0 commentsViews:

विजय राऊत, पालघर, 16 डिसेंबर : आदिवासींचा मखर उत्सव ही खरंतर लोप पावत चाललेली आदिवासींची सांस्कृतिक परंपरा….कारण मुळात हा उत्सवच तब्बल 55 वर्षांतून एकदा साजरा होतो. आदिवासी बांधवांची ही परंपरा यापुढेही चालू राहावी, यासाठी जव्हार तालुक्यातल्या आदिवासींनी नुकताच मोठ्या उत्साहात हा मखर उत्सव साजरा केला.

….आताच आपण किर्रर्र अंधा-या रात्रीतलं हे निर्मनुष्य मेढा गाव पाहिलं…पण त्याआधी आदिवासींनी अगदी आपल्या कोंबड्या झोंबड्यासह गाव का सोडलं ते देखील जाणून घेऊयात.

makhar3गावाबाहेर बांधलेल्या या मखरासमोर हे सर्व आदिवासी बांधव पै पाव्हण्यासह जमा होतात. तेही अगदी आपल्या संसारासहित….आणि मग तिथंच मग सुरू होतो बहुप्रतिक्षित मखर उत्सव…प्रारंभी देवासमोर दगडाचा दिवा लावला जातो…आणि मग भजनाद्वारे देवाचा जागरही घातला जातो..

या मखर उत्सवाची एक आदिवासी दंतकथा देखील सांगितली जाते….ती म्हणजे….अर्वाचिन काळात जेव्हा आदिवासी समाज घनदाट जंगलात राहायचा तेव्हा जंगलातील वाघ आदिवासी पाड्यातील गुरा-ढोरांना उचलून न्यायचा…या संकटातून सुटका करून घेण्यासाठी मग पाड्यावरचे जाणकार वाघोबाला यश करण्यासाठी त्याची गावाबाहेर पूजा करायचे, त्याला नैवेद्य घातला जायचा.

एवढंच नाहीतर कालांतराने या वाघोबालाच आदिवासी बांधव आपली ग्रामदैवत मानू लागले…आणि मग यातूनतच पुढे आदिवासींचे पाडे उभारू लागेल….पण पुढे कालांतराने वाघाची संख्या कमी झाली पण म्हणून काही आदिवासींची वाघावरची भक्ती काही कमी झाली नाही. आदिवासी बांधव आता गावाच्या वेशीवर लाकडात कोरलेल्या वाघ्याच्या प्रतिमेची पूजा करतात…त्यातूनच ही मखर उत्सवाची परंपरा पुढे चालत आलीय. हा उत्सव तब्बल 55 वर्षांतून एकदाच होत असल्याने त्याची तयारीही तब्बल एक वर्षआधी सुरू असते..उत्सवाअगोदर वर्षभर मांसाहार सोडावा लागतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close