पेट्रोल 2.21 तर डिझेल 1.79 रुपयांनी महागलं

December 16, 2016 9:24 PM0 commentsViews:

Petrol16 डिसेंबर : नोटबंदीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने आज आणखी एक धक्का दिला. पेट्रोल प्रतिलिटर दरात 2.21 तर डिझेल प्रतिलिटर 1.79 रुपयांनी महागलं. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होईल.

गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार कायम सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 1.34 आणि डिझेल 2.34 रुपयांनी महागलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल स्वस्त करण्यात आलं होतं. 30 नोव्हेंबरला पेट्रोल 1.46 आणि डिझेल 1.53 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

त्यानंतर पेट्रोल 13 पैशांनी महागलं आणि डिझेल 12 पैशांनी स्वस्त झालं होतं. आता पेट्रोल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून झालेली कपात एकाप्रकारे भरून काढलीये. पेट्रोलच्या दरात तब्बल 2.21 रुपयांनी वाढ केलीये. तर डिझेलही 1.79 रुपयांनी महागलंय. त्यामुळे आधीच सुट्‌ट्यापैशांसाठी वैतागलेल्या सर्वसामान्याचा खिसा कापला जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close