बागवेंनी सादर केली गुन्ह्यांची यादी

May 14, 2010 3:27 PM0 commentsViews: 5

14 मे

तब्बल 19 गुन्हे दाखल असल्याने पासपोर्ट अडकल्याच्या आरोपामुळे व्यथित झालेल्या गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी आज स्वत:च आपल्यावरील गुन्ह्यांची यादी सादर केली.

आपल्यावरचे गुन्हे हे 18-20 वर्षांपूर्वीचे असून यातील 16 गुन्ह्यांतून आपण निर्दोष सुटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्यावर केवळ तीनच राजकीय गुन्हे शिल्लक असल्याचा दावाही बागवेंनी केला.

अर्धवट माहिती देऊन पुण्याचे पोलीस आयुक्त आणि काही राजकीय विरोधक आपल्याला बदनाम करत असल्याचा आरोप यावेळी बागवेंनी केला.

सोमवारी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे या प्रकरणाबाबत पुराव्यासहा म्हणणे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

close