स्वतंत्र विदर्भाला पवारांचा विरोध

May 14, 2010 3:34 PM0 commentsViews: 5

13 मे

स्वतंत्र विदर्भाबाबत पक्षाची भूमिका काहीही असली तरी व्यक्तीश: आपला या मागणीला विरोध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

स्वतंत्र विदर्भाला विदर्भातील जनतेचाही पाठिंबा नाही. केवळ काही हिंदी भाषिक नेत्यांची ही मागणी असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या ' राष्ट्रवादी' या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य होण्यासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले. अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या आहेत.

विदर्भाची निर्मिती ही महाराष्ट्रात आल्यावर झाली. आधी सी. पी. ऍन्ड बेरार नावाने हा प्रांत ओळखला जात असे. मध्य भारतातील या भागातील नेतृत्व गेल्याने हे हिंदी भाषिक अस्वस्थ असून त्यांच्याकडून वेगळ्या विदर्भाची मागणी होत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

close