कॅशलेस व्यवहारामुळे चिनी कंपन्यांचाच फायदा -पृथ्वीराज चव्हाण

December 17, 2016 1:48 PM0 commentsViews:

pruthaviraj_chavan417 डिसेंबर : कॅशलेस व्यवहाराच्या नादात अनेक चिनी कंपन्या भारतात आणल्या जात आहेत. त्यामुळे या अॅप्लिकेशन्सचा वापर करून चिनी कंपन्यांचा फायदा होत असून देशाचं नुकसान होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

नोटबंदीनंतर निर्माण झालेल्या नोटाटंचाईवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने कॅशलेसचा नारा दिला. कॅशलेस व्यवहार करण्यावर अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. यासाठी पेट्रोल ते टोल नाक्यांवर कॅशलेस व्यवहारांवर 0 ते 10 टक्क्यांपर्यंत सूट दिलीये. मात्र, या कॅशलेस व्यवहारावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केलीये. कॅशलेस व्यवहाराच्या नादात अनेक चिनी कंपन्यांना भारतात आणल्या जात आहे. याचा फायदा आपल्याला नसून चिनी कंपन्यांना अधिक होतोय.

 या कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर सायबर हल्ला होण्याचा धोका आहे. हा सायबर हल्ला झाला तर त्यांला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close