बाष्पीभवन रोखण्यासाठी तलावात सोडले 9 कोटी बॉल्स !

December 17, 2016 5:09 PM0 commentsViews:

 अजय कौटिकवार,17 डिसेंबर :  वातावरणातल्या बदलामुळं प्रत्येक देशालाच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये तलावातल्या पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी तब्बल 9 कोटींपेक्षा जास्त बॉल्सचा वापर करण्यात आला. या अनोख्या प्रयोगाचा जगभर चर्चा होतेय.

हे असंख्य काळे बॉल्स सोडण्यात येताहेत.. अमेरिकेतल्या लॉस एंजलीसमधल्या एका तलावात….पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी इथल्या तज्ञांनी हा अनोखा प्रयोग केलाय. अपुरा पाऊस आणि दुष्काळामुळे अमेरिकेतल्या लॉस एंजलीस आणि कॅलिफोर्निया या शहरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं.  त्यामुळे या शहरांना पाणी पुरवढा करणाऱ्या तलावातला प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आलाय.

लॉस एंजलीस शहराजवळचा हा तलाव 172 एकरांमध्ये पसरलाय. शहाराच्या पाणी पुरवढ्याचा मुख्य स्त्रोत…या पाण्यात तब्बल 9 कोटींपेक्षा जास्त काळे बॉल्स सोडण्यात आले. या बॉल्सचं पाण्यावर आच्छादन झालं. त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन 90 टक्क्यांपर्यंत रोखण्यात यश आलं. हे काळे बॉल्स सुर्याची तीव्र अल्ट्राव्हायलेट किरणं शोषून घेतात…तसंच…धुळ आणि इतर प्रदुषणापासूनही संरक्षण होतं. या प्रयोगामुळे वर्षाला 30 कोटी गॅलन पाण्याची बचत झाली. या वाचलेल्या पाण्यामुळे 8 हजार जणांची तहान भागवली जाऊ शकते.

हे बॉल्स बनवण्यासाठी उच्च दर्जाच्या खास प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. त्यामुळे त्या प्लॅस्टिकचा कुठलाही परिणाम पाण्यावर होत नाही. या एका बॉल्सची किंमत आहे फक्त 40 पैसे आणि आयुष्य आहे 15 वर्षांपेक्षा जास्त काळ. हवेमुळं बॉल्स सतत हलत असल्यानं पाण्यात पुरेशी हवा खेळती राहते आणि त्यावर शेवाळही जमा होत नाही. आज जगभरात या प्रयोगाची दखल घेतली गेलीय.

वातावरण बदलामुळे दुष्काळाचा सामना सर्वच देशांना करावा लागतोय. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक  थेंब वाचवणं महत्वाचं आहे. या प्रयोगातून हाच संदेश दिली गेलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close