माझगाव डॉक पन्नाशीत

May 14, 2010 5:57 PM0 commentsViews: 25

14 मे

मुंबईत भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुडी बनवणार्‍या माझगाव डॉकला यंदा 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

यानिमित्ताने माजगाव डॉकमध्ये सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

डॉकमध्ये 50 वर्षांपासून काम करणार्‍या कामगारांचा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्कार केला. माझगाव डॉकने गेल्या 50 वर्षांमध्ये भारतीय नौदलासाठी 24 युद्धनौका आणि 2 पाणबुड्या बनवल्या आहेत.

यापुढेदेखील नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी या डॉककडे कोलकाता क्लासच्या युद्धनौका बनवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर आयएनएस शिवालीक या रडारवर न दिसणार्‍या आणखी दोन युद्धनौकादेखील डॉकमध्ये बनवल्या जात आहेत.

close