रस्ता क्रिकेट बंद

May 14, 2010 6:02 PM0 commentsViews: 4

14 मे

शाळा-कॉलेजच्या सुट्टया सुरु झाल्या की मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवर क्रिकेटच्या मॅच रंगू लागतात. पण आता रस्त्यावर क्रिकेट खेळणार्‍या मुलांना पोलिसांचा दंडुका बसणार आहे.

रस्त्यावर क्रिकेट खेळण्यामुळे अनेक गंभीर प्रसंग ओढावतात. तसेच वाहतुकीचीही कोंडी होते. हे टाळण्यासाठी उत्तर मुंबईत रस्त्यावर क्रिकेट खेळण्याला बंदी घालण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

दहिसर, कस्तुरबा मार्ग, समतानगर, कुरार, दिंडोशी, गोरेगाव या भागात या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.

close