शरद पवारांचा एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

December 17, 2016 8:07 PM0 commentsViews:

sharad pawar MCA17 डिसेंबर : शरद पवार यांनी  एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.  व्यवस्थापकीय समितीकडे त्यांनी त्यांचा राजीनामा सोपवलाय.  मात्र, समिती आता पवारांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नको. तसंच एका पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त दोन वेळाच पदाधिकारी होता येतं. या शिफारसीमुळे शरद पवार हे अपात्र ठरत होते. शरद पवारांचं वय आणि दोनदा अध्यक्ष राहिल्यामुळे पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी हे या राजीनाम्यामागचं कारण आहे का की, आणखी काही हे अजून कळु शकलेलं नाही. पण शरद पवारांनी राजीनामा दिल्याने एमसीए वर्तुळात चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close