खुशबू द्रमुकमध्ये दाखल

May 14, 2010 6:08 PM0 commentsViews: 2

14 मे

प्रसिद्ध आणि तितकीच वादग्रस्त ठरलेली तमीळ अभिनेत्री खुशबूने आज द्रमुकमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची भेट घेऊन तिने पक्षप्रवेश केला.

प्रवेश झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना करुणानिधींनी खुशबूची स्तुती केली. आणि तिला एक पुरोगामी महिला म्हटले.

खुशबूने काही दिवसांपूर्वी करुणानिधींची कन्या आणि खासदार कनिमोळीची भेट घेऊन द्रमुकची विचारधारा समजून घेतली होती.

ऐंशी-नव्वदच्या दशकांत खुशबू कमालीची लोकप्रिय होती. आजही तामिळनाडूत तिची मंदिरे आहेत.

पण मध्यंतरी विवाहपूर्व लैंगिक संबंधाची पाठराखण केल्यानंतर मात्र ती वादात सापडली होती. तिच्या विरोधात कोर्ट केसेस दाखल झाल्या.

पण गेल्या आठवड्यातच सुप्रीम कोर्टाने तिच्या विरोधातील सर्व केसेल रद्दबातल करून तिला दिलासा दिला होता.

close