भाजपचं व्हिजन भाजपकडेच राहू द्या -उद्धव ठाकरे

December 17, 2016 10:02 PM0 commentsViews:

 uddhav_on_cm

17 डिसेंबर :  भाजपचं व्हिजन भाजपकडेच ठेवा, मुंबईकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर सहन करणार नाही असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.

महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपची यूती होणार की नाही. यावर महापालिकेची सत्तासमिकरणं अवलंबून आहेत. पण सध्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धामुळे युती मध्ये चांगलीच दरी निर्माण झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना आक्रमक उत्तर दिलं.

भाजपचं काय व्हिजन आहे ते आम्ही तपासणार नाही. ते व्हिजन तुमच्याकडेच ठेवा. शिवसेना विकासासाठी बांधिल असून खंबीर आहे. उद्या युती झाली किंवा नाही झाली तरी याचा काही फरक पडणार नाही. मुंबई तोडण्याचे तुमचे व्हिजन असेल तर त्याची आम्हाला परवा नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात ठणकावलं.

तर त्याआधी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये भाजपच्या अटींवर युती होईल असं स्पष्टं केलं होतं. त्यामुळे या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक युद्धाचा परीणाम महापालिका यूतीवर होणार असल्याचं चित्र सध्यातरी स्पष्टं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close