मुंबईतील सायनमधील झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात

December 18, 2016 9:11 AM0 commentsViews:

Sion Fire1

18 डिसेंबर : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाजवळच्या प्रेमनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आग लागलेल्या झोपडपट्टीत कुठलंही पक्कं बांधकाम नव्हतं. निवासासाठी तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या झोपड्यांमध्ये 50 ते 60 लोक राहत होते, अशी माहिती हाती आली आहे.

आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. झोपड्यांच्या आजूबाजूला प्लास्टिक आणि कपड्यांच्या कचऱ्याचा ढीग असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते. मात्र, अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close