हैदराबादमध्ये गोळीबारात पोलीस ठार

May 14, 2010 6:14 PM0 commentsViews: 4

14 मे

हैदराबादच्या जुन्या भागात आज दोन तरुणांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एका पोलीस कॉन्टेबल ठार झाला.

जुन्या हैदराबादेत एका नाक्यावर पाच पोलीस उभे होते. तिथे भरधाव वेगाने एका बाईकवरून दोन तरूण आले. त्यांनी या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि पळ काढला.

या घटनेमागे प्रतिबंधित सिमी संघटनेचा सदस्य सय्यद वकारुद्दिन असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

यापूर्वीही झालेल्या अशाच एका घटनेत वकारुद्दिन सहभागी होता.

close