जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे सौरभ फराटे शहीद

December 18, 2016 2:23 PM0 commentsViews:

shahid12

18 डिसेंबर : श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पॅम्पोर इथे लष्करी ताफ्यावर काल शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झालेत तर दोन जवान जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात येथील पुण्याजवळील फुरसुंगी गावातील सौरभ नंदकिशोर फराटे शहीद झाले. ते 33 वर्षांचे होते. सौरभ 13 वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. फुरसुंगीतल्या गुरुदत्त कॉलनीत फराटे कुटुंबिय राहतात. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. सौरभ फराटे यांचे भाऊही सैन्यदलात कार्यरत असुन त्यांचंही पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये आहे.

त्यांचं पार्थिव आज विमानाने पुण्याला आणणार असून उद्या सकाळी 10 च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या जाण्याने हडपसर परिसरावर शोककळा पसरली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close