स्वाभिमानची पाणी वाचवा मोहीम

May 14, 2010 6:19 PM0 commentsViews: 3

14 मे

नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेने मुंबईत पाणी वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे.

पाणी चोरी आणि टँकर लॉबीविरोधातील आंदोलनानंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आता पाणीगळतीकडे लक्ष वळवले आहे.

अंधेरीतील मोरारजीनगर भागात पाईपलाइनमधून होणारी गळती या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

या पाईपलाइमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जाते. ही पाणीगळती तातडीने थांबवली जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकार्‍यांनी दिले.

close