झोपड्या हटावमध्ये तरुण मृत्यूमुखी…

May 15, 2010 9:54 AM0 commentsViews: 1

15 मे

मानखुर्दमधील अण्णाभाऊ साठे नगरातील झोपडपट्‌ट्या पाडण्याच्या कारवाईदरम्यान एका 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिवा भुतेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे.

या कारवाईच्या वेळी रिलायन्सने वीज पुरवठा खंडित केला नव्हता. त्यामुळे या तरुणाला वीजेचा धक्का बसला.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे समर्थन

दरम्यान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या झोपड्या हटाव कारवाईचे समर्थन केले आहे. मंुबईसारख्या शहरात अतिक्रमण होत असते. पण ते हटवणेही गरजेचे असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या झोपड्या हटवण्याच्या कारवाईला येथील रहिवाशांचा मोठा विरोध आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सहभाग घेतला.

कोणतीही नोटीस न देता झोपड्या पाडण्याची कारवाई झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि मेधा पाटकर यांनी केला आहे.

ही जागा सोप इंडिया नावाच्या एका खाजगी कंपनीकडे होती. तिच्या सोबतचा करार अचानक रद्द करुन मुंबई जिल्हा प्रशासनाने या जागेवर आपला अधिकार सांगितला. यातच काहीतरी काळेबेरे दडल्याचा आरोप मेधा पाटकरांनी केला आहे.

close