काँग्रेसचा हात उंचावला, भाजपचीही सरशी

December 19, 2016 4:57 PM0 commentsViews:
 • Jan 9, 2017

  16:12(IST)

  : काटोलमध्ये नगराध्यक्षपदी विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर विजयी

 • 16:11(IST)

  : नागपूर: काटोल नगरपरिषदेत विदर्भ माझा पक्षाची सत्ता; एकूण 20 जागांपैकी विदर्भ माझाला 15, शेकापला 4 आणि भाजपला एक जागा

 • 16:09(IST)

  : नागपूर: खापा नगरपरिषद : भाजपला १४ जागा तर काँग्रेस आणि अपक्षला प्रत्येकी एका जागेवर विजय

 • 16:08(IST)

  : नागपूर: खापा नगरपरिषदेवर भाजपची सत्ता; नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका मोहिते विजयी

 • 13:24(IST)

  : खापामध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका मोहिते विजयी. भाजप 15, काँग्रेस 1, अपक्ष 1

 • 13:19(IST)

  : मोहपा नगरपालिका काँग्रेसकडे; एकूण 17 जागांपैकी काँग्रेसला 10 जागा आणि भाजपला 5 जागांवर विजयी

 • 13:17(IST)

  : नरखेडमध्ये नगरपरिषद अध्यक्षपदी नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता विजयी

 • 13:15(IST)

  : नरखेड नगरपालिकेत भाजपला धक्का; राष्ट्रवादी 8 जागांवर, नगरविकास आघाडी 5 जागांवर, शिवसेना 3 जागांवर विजयी; भाजपला एकही जागा नाही.

 • 13:15(IST)

  : तिरोडा नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे विजयी

 • 13:12(IST)

  : तिरोडा नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे विजयी

 • 13:10(IST)

  : सावनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता; भाजपला 11 जागा तर काँग्रेसला दोन जागांवर विजय

 • 13:08(IST)

  : कळमेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजप स्मृती इखार विजयी

 • 13:07(IST)

  : कळमेश्वर नगरपरिषदेत काँग्रेसला 10 जागा, भाजपला 5 आणि शिवसेनेला 2 जागांवर विजय

 • 12:09(IST)

  : तिरोडा नगरपरिषद निकाल; राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप ४, शिवसेना २ जागांवर विजयी

 • 12:06(IST)

  :  गोंदिया: तिरोडा नगरपरिषदेवर सत्ता राष्ट्रवादीची पण नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी

LOAD MORE

congress_bjp_win19 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेसला अखेर स्थानिक निवडणुकीत सूर गवसलाय. नगरपरिषदा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काँग्रेसचा हात उंचावलाय. दोन्ही टप्प्यात काँग्रेस बॅकफूटवर होती. आता 19 जागांपैकी 19 जागा जाहीर झाल्या असून 8 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय. तर त्यापाठोपाठ भाजपने दुसऱ्या जागा पटकावली असून 8 जागा जिंकल्या आहे.

नगरपरिषदा निवडणुकीत दोन्ही टप्प्यात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपने बाजी मारलीये. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकत अव्वल राहिलं. तिसऱ्या टप्पातऔरंगाबाद,नांदेड,भंडारा आणि गडचिरोलीमध्ये  एकूण 19 नगरपरिषदांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली ती अजूनही कायम आहे. काँग्रेसचे 5 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये अर्धापूर, बिलोली नगर परिषदेत काँग्रेसने बाजी मारलीये.  एकूण चार ठिकाणी काँग्रेसने सत्ता काबीज केलीये.

दरम्यान, मुदखेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसलाय. काँग्रेसचे 10 नगरसेवक विजयी झाले पण नगराध्यक्षपद अपक्ष उमेदवाराकडे गेलंय. तर उमरीमध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी 17 जागा जिंकत आपली सत्ता कायम राखली आहे. तर गडचिरोलीतही भाजपने खातं उघडलं असून  25 जागा पैकी 18 जागा पटकावल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close