भाजपची घौडदौड कायम ; काँग्रेसचं कमबॅक तर शिवसेनाला भोपळा

December 19, 2016 7:14 PM0 commentsViews:

bjp_congress_senaप्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 19 डिसेंबर :  नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात देखील भाजपनं 8 जागा जिंकत आघाडी कायम राखलीय. या निवडणुकीत काँग्रेसनं चांगलंच कमबॅक केलं असं दिसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश थांबवता आलेला नाही. या संपूर्ण निकालांचे आगामी महानगरपालिका आणि जिल्हापरीषद निवडणुकीत पडसाद उमटतील हे नक्की दिसतंय.

राज्यातील नगरपालिकेचा 19 जागांसाठीची मतमोजणी पूर्ण झाली. 19 जागांपैकी भाजपला आणि काँग्रेसला प्रत्येकी आठ जागा जिकल्यात. शिवसेनेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय. नगरसेवकांची बेरीज पाहिली तर लक्षात येतं भाजपचे गेल्या वर्षी 25 नगरसेवक होते. ते आता 115 झालेत. काँग्रेसचे 150 नगरसेवक होते ते आता 106 झालेत. राष्ट्रवादीचे 106 नगरसेवक होते ते केवळ 66 वर आलेत. पहिल्या टप्याच्या तुलनेत नगराध्यक्षपदांच्या तुलना झाली तर काँग्रेसनं या टप्यात कमबॅक केलंय.

मराठवाड्यात पहिल्या टप्यात हुकलेलं यश तिसऱ्या टप्यात भाजपाला मिळालं
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उत्तम परिस्थिती असताना दोन्ही पक्षांची दाणादाण
प्रफुल्ल पटेल आणि अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात नगराध्यक्षपदाचे उमेदवार मतदारांनी नाकारले.
विदर्भात भाजपाला मतदारांनी पुन्हा हात दिलाय.

राष्ट्रवादीनं या पराभवाकडे विश्लेषणात्मक बघायला हवं होतं पण या पराभवाचं खापर राष्ट्रवादीनं  कॉंग्रेसच्या माथ्यावर फोडलंय. काँग्रेसनं मदत केली नाही, काँग्रेसने ठरवावं त्यांचा शत्रू भाजप आहे की राष्ट्रवादी ? असा सवालच नवाब मलिक यांनी केलाय.

निवडणुकांचे निकाल पाहात आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत आघाडी करावी का ? याचा विचार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला विचार करावाचं लागणार आहे. पण युती मध्ये दोन्ही पक्षात बोलणी झालीच तर भाजप या आकडेवारीनं शिवसेनेवर दबाव टाकणार हे तितकच सत्य आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close