चार लाखांपर्यंत टॅक्स लागणार नाही ?

December 19, 2016 7:36 PM0 commentsViews:

tax_slab19 डिसेंबर :  नोटबंदीनंतर मोदी सरकार टॅक्स स्लॅबमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. इन्कम टॅक्समध्ये बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यानुसार, टॅक्स सूटची मर्यादा अडीच लाखांवरुन चार लाख करण्यात येणार आहे. म्हणजे चार लाखांपर्यंत टॅक्स लागणार नाही.

तर चार ते 10 लाखांपर्यंत 10 टक्के टॅक्स लागणार आहे. 10 ते 15 लाखांपर्यंत उत्पन्नावर 15 टक्के टॅक्स लागेल. त्याचप्रमाणे 15 ते 20 लाखांच्या उत्पनावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे. आणि ज्यांचे उत्पन्न 20 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी 30 टक्के टॅक्स लागेल.

सध्या टॅक्स स्लॅब हे निर्धारित आहे. त्यामध्ये अडीच लाखांपर्यंत टॅक्स सूट आहे. तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि 5 लाखांपर्यंत कमाई असणाऱ्यांना 10 टक्के टॅक्स लागू आहे. तसंच ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत आहे  उत्पन्न आहे त्यांना 20 टक्के टॅक्स लागू आहे. 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के टॅक्स द्यावा लागतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close