‘सचिन टिचकुले’ची आठवण करुन देणारा जाॅली एलएलबी 2

December 19, 2016 8:05 PM0 commentsViews:


अक्षय कुमारचा आगामी चित्रपट जॉली एलएलबी-2चा ट्रेलर आज लाँच झालाय. त्यात तो वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी,सतिश कौशिक,अन्नु कपूर आणि सौरभ शुक्लासुद्धा दिसून येणार आहे. 10 फेब्रुवारीला हा सिनेमा भेटीला येईल. फॉक्स स्टार स्टुडीओज्‌ची निर्मीती असलेला हा चित्रपट कोर्टरुम ड्रामावर आधारीत आहे. ट्रेलरमधून तो काहीसा विनोदी,काहीसा उपदेशात्मक वाटतोय.सुभाष कपूर लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा सत्य कथेवर आधारीत असल्याचं म्हटलं जातंय. ट्रेलर पाहुन तुम्हाला ‘खट्टामिठ्ठा’ मधील सचिन टिचकुलेची नक्की आठवण करून देईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close