मोदींचे 12,000 पानी उत्तर

May 15, 2010 5:05 AM0 commentsViews: 1

15 मे

भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या सगळ्यात मोठ्या वादाचा क्लायमॅक्स आता जवळ आला आहे. ललित मोदी विरुद्ध बीसीसीआय अशा या युद्धात मोदींनी आपला आक्रमक बाणा सुरुच ठेवला आहे.

त्यांच्यावर बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला आज मोदींनी अधिकृतपणे उत्तर दिले. आणि आपल्यावर लावलेले सगळे आरोप चुकीचे आहेत, असे पुन्हा एकदा ठासून सांगितले. मोदींना दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच मीडियाने बीसीसीआय कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

अखेर संध्याकाळी सहा वाजता मोदींचे वकील मेहमूद आबदी तिथे पोहोचले. आणि नोटिसीला उत्तर म्हणून त्यांनी बरोबर आणला होता12हजारपानांचा रिपोर्ट आणि नऊ हजार पेक्षा जास्त पानांचा पुरावा…

मोदींनी त्यांच्यावर केलेले सर्वच्या सर्व म्हणजे 22 आरोप फेटाळले आहेत. आणि आयपीएल कमिशनर म्हणून आपली पुनर्नियुक्ती व्हावी अशी मागणीही केली आहे. पुढील 3-4 तासात या मागणीचा बीसीसीआय अध्यक्षांनी विचार करावा, असेही मोदींनी म्हटले आहे.

आपल्यावर झालेले आरोप तद्दन खोटे, बिनबुडाचे आणि पुराव्याशिवाय केलेले आहेत, असेही मोदींनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

close