माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहा जणांना अटक

December 20, 2016 9:20 AM0 commentsViews:

Datta Gaiwada1

20 डिसेंबर : माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड याला पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केलीय. काल सकाळी शिवाजी गायकवाड यांचा वडकी गावात खून झाला होता. राजकीय वादातून हा खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय होता. मात्र गायकवाड यांच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांच्यावर संशय असल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी दत्ता गायकवाड यांना अटक केली. लोणी काळभोर पोलिसांनी दत्ता यांना ताब्यात घेतलं असून पूर्व वैमनस्यातुन हा हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.

वडकी इथे जमिनीच्या वादातून आणि पूर्व वैमनस्यातून एका व्यक्तीला रस्त्यात अडवून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहा आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी दामोदर गायकवाड असे खून झालेल्याचं नाव आहे. या प्रकरणी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय भानुदास गायकवाड यांच्यासह 6 जणांना अटक केली आहे.

गायकवाड यांच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांच्यावर संशय असल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी दत्ता गायकवाड यांना अटक केली. राजकीय वादातून हा खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय होता.

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजी गायकवाड दुचाकीवरून हडपसरमधील सिरम कंपनीत निघाले होते. वडकी गावाच्या मुख्य रस्त्यावरून ते जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर कोयता आणि गजाने वार केले. या हल्ल्त गायकवाडा यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी पळून गेले. आजूबाजूच्या नागरिकांनी गायकवाड यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, लोणीकाळभोर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू करून सहा आरोपींना अटक केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close