दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी

May 16, 2010 6:24 AM0 commentsViews: 3

16 मे

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आज चेंगराचेंगरी होऊन दोन जण ठार तर आठजण जखमी झाले. यात एक महिलेचा आणि एका मुलाचा समावेश आहे.

दिल्ली-मुझफ्फूर एक्सप्रेस आणि विक्रमशीला एक्स्प्रेस या दोन गाड्यांचे प्लॅटफॉर्म नंबर बदलण्यात आले. त्यातून प्रवाशांची धावपळ उडून ही दुर्घटना घडली.

प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३वर ही चेंगराचेंगरी झाली.

मृत महिला बहादूरगड येथे राहणारी असून मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्रशासनाने मृतांना दोन लाख, गंभीर जखमींना ५० हजार तर इतर जखमींना १५ हजार रुपये भरपाई जाहीर केली आहे.

close