सीआयडीच्या प्रद्युमनना येणार हार्ट अटॅक

December 20, 2016 9:00 AM0 commentsViews:

shivaji satam

20 डिसेंबर: सीआयडी फॅन्ससाठी अतिशय वाईट बातमी आहे. ‘दया यहाँ कुछ तो गडबड है’ असं आता ऐकू येणार नाही. कारण एसीपी प्रद्युमन हे जग सोडून जाणार आहेत. लवकरच मालिकेत त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू होणारेय.

येत्या 26 डिसेंबरच्या भागात ही घटना घडणारेय. आता यापुढे शिवाजी साटम सीआयडीत दिसणार नाहीत. असंही म्हणतात की त्यांनी आपली फी वाढवून मागितल्यानं निर्मात्यानं हा निर्णय घेतलाय.

बरेच दिवस सीआयडी मालिका बंद होणार अशी चर्चा होती. आणि आता ते खरं होणार आहे. लवकरच सीआयडी मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणारेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close