सोनेखरेदीसाठी गर्दी

May 16, 2010 8:10 AM0 commentsViews: 1

16 मे

वाढत्या महागाईत सोने साडेअठरा हजारांवर गेले असतानाही आज सराफबाजारांमध्ये सोनेखरेदीसाठी झुंबड उडाली. याचे कारण होते, आज असलेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, अक्षय तृतीया…!

त्यामुळे या मुहूर्तावर आज थोडे का होईना सोने खरेदी करण्याची परंपरा अनेकांनी पाळली. शिवाय रविवारची सुटी असल्याने नागरिक सोनेखरेदीसाठी बाहेर पडले. मुंबई, पुणे, सांगली आणि जळगावात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्यात आली.

सोन्यासोबतच अक्षय तृतीया हा घरखरेदीचाही मुहूर्त असल्याने अनेक बिल्डर्सकडे स्वप्नातील घराच्या बुकिंगसाठी गर्दी दिसत होती. अगदी ५० हजारांचे डिपॉझिट भरूनही घरे बुक करण्याची सुविधा काही बिल्डर्सकडून देण्यात आली होती.

close