साताऱ्यात 60 लाखांच्या नव्या नोटासह कार जप्त

December 20, 2016 5:15 PM0 commentsViews:

satara_note20 डिसेंबर : जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणारी आणि त्यासाठी कमिशन घेणारी टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे.  तसंच त्यांचाकडून 60 लाखाच्या नवीन नोटा ही जप्त करण्यात आलेल्या असून एक कारही ताब्यात घेण्यात आलीये.

सोमवारी रात्री साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात नवीन नोटा घेऊन कोल्हापूरचे तीन जण येणार असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती.सातारा पोलिसांनीसापळा लावला आणि त्यात हे कोल्हापूरचे 3 व्यावसायिक 60 लाखाच्या नव्या नोटांसह सापडले. 30 टक्के कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ते साताऱ्यात आले होते असं तपासात पुढे आलं. मात्र नव्या नोटांची एवढी मोठी रक्कम या लोकांकडे कशी आणि कोठून आली आणि या टोळीचा मोरक्या कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचं सातारा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close